आमच्या विषयी

थोडक्यात आमच्या विषयी

happy boy

आमच्याबद्दल खूप काही

कोल्हापूरातील नामांकित साप्ताहिक करवीरनगरी सन 2017 पासून निस्वार्थीपणे सामाजिक कार्य करत आहे. समाजहित, सामाजिक बांधिलकी आणि लोकजागृती यासाठी गेली 7+ वर्षे आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

कोरोना काळात मुलांमध्ये वाढलेला मोबाइल व टीव्हीचा Screen Time कमी व्हावा, तसेच मुलांना पुन्हा वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ऑगस्ट 2021 मध्ये “च्याव-म्याव प्रकाशन” ची स्थापना करण्यात आली. या प्रकाशनाचा शुभारंभ मा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर) यांच्या हस्ते झाला हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे.

आज महाराष्ट्र, गोवा आणि तामिळनाडूमधील हजारो पालक आमच्यावर विश्वास ठेवून मुलांसाठी नियमित मासिक घेत आहेत.

संपादकीय संदेश

रोहन  श्रीकांत तुरंबेकर

लहान मुलांना वाचनाची आवड लागावी , मुलांचा स्क्रीन टाइम कमी व्हावा आणि मुलांची कल्पना शक्ती वाढावी या उद्देशाने आम्ही प्रत्येक महिन्यात मुलांना आवडणारे वेगवेगळे विषय घेऊन येतो ,मुलांना वाचना सोबत , मुलांचे सामाजिकीकरण करणे असे मासिक बनवण्याचा आमचा प्रयन्त असतो !!

रोहन श्रीकांत तुरंबेकर

संपादक